मुंबईच्या सेकंडरी सोसायटी निवडणूकीत समता पँलनचे १९/० असे घवघवित यश

पुरंदरचे सुधाकर जगदाळे यांची उपाध्यक्षपदी निवड

सासवड:: ३३ हजार शिक्षक-शिक्षकेतर सभासद असलेल्या व राज्यात २२शाखा असलेल्या सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या सोसायटीची नुकतीच निवडणूक होऊन यात समता पँलनलला १९ विरुद्ध ० असे घवघीत यश मिळाले. भिवडी ( ता. पुरंदर ) येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
विधान भवन ( मुंबई ) या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार संजय जगताप, शामकांत भिंताडे, चंद्रकांत पाटील,जे.आर.पाटील, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले,तानाजी झेंडे,दिलिप पापळ, हनुमंत पवार, रामप्रभू पेटकर ,दत्तात्रय रोकडे आदी उपस्थित होते.
सोसायटीची कार्यकारणी पुढील प्रमाणे ः अध्यक्ष ः चंद्रकांत पाटील, सचिव ः किशोर पाटील, सहसचिव ः सतीश माने, खजिनदार ः सतेज शिंदे.
या पतसंस्थेचे ३३ हजार सभासद असून १८०० कोटींचा संयुक्त व्यवसाय आहे. सभासदांना २५ लाखा पर्यंत कर्ज देणारी राज्यातील एकमेव सोसायटी असून, कर्जदार सभासदाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कर्ज माफ केले जाते.
भविष्यात पस्तीस लाख रुपयापर्यंत कर्जमर्यादा, सभासदांसाठी वैद्यकीय योजना विमा योजना राबवणार असून सर्वांच्या हितासाठी काम करणार असल्याचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.