४१ वर्षांनी परिंचे विद्यालयातील माजी विदयार्थ्यांनी जागवल्या जुन्या स्मृती
सासवड :: . भक्तिगीतांची मंद सुरावट .. स्वागताला आकर्षक रांगोळी .. नव्या जुन्या आठवणींना उजाळा…तत्कालीन शिक्षकांची मनाला भावलेली उपस्थिती ,,, विचारांची देवाणघेवाण …. उपस्थित माजी विद्यार्थिनींची खणा नारळाने ओटी …. सोबतीला पुरणपोळीचा बेत अशा उत्साही वातावरणात पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील कर्मवीर विद्यालयातील मार्च १९८०च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्नझाला
याच ग्रुपचा विद्यार्थी आणि एच पी कंपनीतून सेवानिवृत्त झालेलया अरुण दगडू भोसले यांच्या पुणे येथील निवासस्थानी झालेल्या या सोहळ्याला तीन पिढ्यांना शिकवणारे आदर्शवत भीमराव बाणखेले सर व तत्कालीन प्राध्यापक सुधाकर पडवळ यांसह तब्बल ३५ हुन अधिक माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली , मनोगतातून वैयक्तिक जीवनाचा आढावा ,,शालेय जीवनातील अनेक अनुभव कथन करत अनेकांनी नव्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला . अरविंद शिर्के , राजू टेलर ,गोरक्ष शिंदे ,भुजंग यादव ,राजेश जाधव शरद चवरे ,नामदेव बुवा यांसह अनेकांनी मनोगते मांडली सर्व उपस्थितांना स्मृतिचिन्ह , डायरी व अन्य भेटवस्तू देण्यात आल्या ,नुकतेच सेवानिवृत्त झालेल्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .सुधाकर पडवळ यांनी शुभेच्छापर मनोगतातून संदेश दिले , मुख्य अतिथी असणाऱ्या बाणखेले सरांनी या स्नेहमेळाव्याने आपण भारावून गेलो असून तुमचा आणि तुमच्या नव्या पिढीच्या मुलांबाळासमवेत वैचारिकसूर जुळला पाहिजे असे मत मांडले
मेळाव्याला सविता जोशी ,अस्मिता जोशी ,कमल निरभुवने , राधा भुजबळ या माजी विद्यार्थिनींनी उत्साही हजेरी लावत सक्रिय सहभाग नोंदवला . परिंचे ,हरगुडे , यादववाडी ,मांढर .वीर ,कांबळवाडी .शिंदेवाडी ,माहूर ,दुधाळवाडी इत्यादी गावचे माजी विदयार्थी यावेळी हजर होते . हेमंत ताकवले यांनी सुत्रसंचलन केले . अरुण भोसले , मीनाक्षी भोसले .अक्षता व जयेश भोसले ,अंतरा चवरे ,शिनू ओव्हाळ या मंडळींनी “आम्ही ऐंशीची पोरं ” हे शीर्षक घेऊन पार पडलेल्या या स्नेह मेळाव्याचे उत्तम आणि नेटके संयोजन केले