कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुरंदरचे प्रशासन सज्ज.

प्रतिबंधात्मक ऊपाय करण्यासाठी आमदार संजय जगताप यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ..

पोलीस व नगरपालीकेचे वतीने विनामास्क फिरणा-यास ५०० रूपये दंड व रस्त्यावर थुंकणा-यास १००० रूपये दंड आकारण्यात येणार आहे ..

सासवड : राज्यात कोरोनाची तीसरी लाट येण्याचे संकेत मिळत असल्याने व ओमिक्रोनचे रुग्ण वाढत असल्याने. पुरंदर तालुक्याचे महसुल प्रशासन याबाबत सतर्क झाले असून तीसऱ्या लाटेत कमीत कमी नुकसान कसे होईल यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यासाठी पुरंदरचे सर्व प्रशासकीय यंत्रना आता सज्ज झाली आहे.प्रतिबंधात्मक ऊपाय योजना करण्यासाठी आमदार संजय जगताप यांचे अध्यक्षते खाली तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

याबाबत आज दिनांक ०७ जानेवारी रोजी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात सर्व यंत्रणा प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी दौंड -पुरंदर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अन्नासाहेब घोलप ,जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, पुरंदर पंचायत समितीचे अमर माने, सासवड नगरपरिषदेचे सी.इ.ओ.निखील मोरे,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.किरण राऊत, सासवड नगरपालीकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, व्यापारी असोशिएशनचे संजय चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.
————————————————————————————
विना मास्क फिरणाऱ्यास रुपये पाचशे दंड व रस्त्यावर थुंकणाऱ्यास रुपये १ हजार दंड आकारण्याचे पोलीस व नगरपरिषद या दोघांच्या विद्यमाने कारवाई करण्याचे ठरले .तसेच प्रत्येक दुकानदाराने दुकानदाराकडे येणाऱ्या ग्राहकास मास्क लावल्याशिवाय प्रवेश देऊ नये असेही बैठकीत ठरविण्यात आले.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पुढील तीन दिवसात पूर्ण करणे बाबत देखील आमदार संजय जगताप यांनी यावेळी सूचना केली

या बैठकीत पुढील सूचना देण्यात आल्या.
१ .सर्व देवस्थान विश्वस्तांनी यांच्या मंदिर परिसरात दोन डोस घेतलेल्या भाविकांना प्रवेश द्यावा. मंदिर परिसरात सॅनिटायजर ठेवावे .सर्व भाविक मास्क घालूनच आलेले आहेत याची खात्री करावी.
२ .तालुक्यातील सर्व अस्थापना चालकांनी त्यांच्या आस्थापनेत येणाऱ्या ग्राहक किंवा कर्मचाऱ्यांनी मास्क घातलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. अस्थापणेच्या परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
३ .पी एम पी एम एल बस मधील वाहक व चालक यांनी बस मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४ .मंगल कार्यालय किंवा मोठे समारंभ होणाऱ्या आस्थापना चालकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
५ . नगरपालिका व ग्राम स्तरावर वेगवेगळ्या आस्थापना कोरोना नियमांचे पालन करीत आहे किंवा नाही याची तपासणी करणेकरिता संयुक्त पथक नेमण्यात येणार आहे.
६  .फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना १० जानेवारीपासून  बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.