- संघटना मजबूत करण्याबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साठी प्रयत्न करणार.:- वसंतराव ताकवले सासवड :- संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणारच परंतु कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी संघटनेच्या पातळीवर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न सर्व शिक्षकांच्या माध्यमातून करणार असे उद्गार पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांनी काढले.नुकतीच पुणे जिल्हा शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी,व महिला शिक्षिका संघ कार्यकारिणी निवड महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे येथे झाली यावेळी वसंतराव ताकवले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन विद्यार्थी विकासासाठी योग्य नियोजन केले जाईल.पाठ्यक्रमाबरोबरच आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी बाह्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये चमकले पाहिजेत.विद्यार्थीगुणवत्ता वाढली की आपल्याही समस्यांचा विचार शासनास करावाच लागेल.असे सांगितले. पुणे जिल्हा शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य शिक्षक लोकशाही आघाडी चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी.के थोरात,के.एस ढोमसे प्रा.शिवाजीराव कामथे सचिन दुर्गाडे सोमनाथ भंडारे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. पुणे जिल्हा शिक्षक संघ : अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले, कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय अरकडे कार्यवाह श्री पंकज घोलप उपाध्यक्ष श्री अशोक नाळे प्रसिद्धी प्रमुख श्री रामप्रभू पेटकर शिक्षक लोकशाही आघाडी :- अध्यक्ष श्री मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे, सचिव श्री राजेन्द्र पडवळ, प्रसिद्धी प्रमुख श्री संदीप गाडेकर, श्री प्रशांत बेंगळे, महिला शिक्षिका संघ : अध्यक्षा सौ स्वाती उपार , कार्याध्यक्ष सौ सविता ताजणे, कार्यवाह सौ जयश्री काळभोर, उपाध्यक्षा सौ रेश्मा यादव,आयव्यय निरीक्षक सौ प्रज्ञा वाघमारे,सौ विद्या कारंडे, अध्यक्ष प्रतिनिधी सौ मोहिनी लोणकर अशा निवडी करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस हनुमंत भोसले,जी.के थोरात के.एस ढोमसे यांनी शुभेच्छा दिल्या. या सभेसाठी राज मुजावर, धर्मेंद्र देशमुख, नंदकुमार लंगडे, अशोक धनोकर, इस्माईल सय्यद, जयवंत थोपटे, दिलीप पापळ, बाबुराव गायकवाड,बालम शेख, राधाकृष्ण येणारे सौ.बारबोले तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिका व अहवाल वाचन दत्तात्रय अरकडे यांनी केले . सुत्रसंचलन श्री मुरलीधर मांजरे तर आभार प्रदर्शन सचिन दुर्गाडे यांनी मानले.