सभासदांचे हिताबरोबरच त्यांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारी एकमेव पतसंस्था म्हणजे सेकंडरी पतसंस्था. : – आमदार संजय जगताप


सासवड :- समाजाच्या सक्षमीकरणासाठी समाजकारण आणि राजकारण यामध्ये शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आणि म्हणून शिक्षकांना सेवा पश्चात चांगले आयुष्य लाभावे म्हणून मी सरकारकडे जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आग्रही आहे.मृत सभासदांचे शंभर टक्के कर्ज माफ करणारी सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज को ऑफ क्रेडिट सोसायटी ही एकमेव शिक्षकांची पतसंस्था आहे.आणि ही संस्था राजकारण विरहित शिक्षकांनी चालवलेली अतिशय सक्षम आणि भक्कम आहे.असे गौरवोद्गार पुरंदरचे कार्यक्षम आमदार संजय जगताप यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा समारंभ प्रसंगी काढले.
सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज को ऑफ क्रेडिट सोसायटी लि.मुंबई या पतसंस्थेच्या सासवड शाखेच्या वतीने सभासद पाल्य गुणगौरव सोहळा व सभासद प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पुरंदरचे आमदार संजय जगताप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व दत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शामकांत भिंताडे सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री मोहन गायकवाड, पुणे जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर होते.या वेळी दिगंबर दुर्गाडे यांनी पतसंस्थेविषयी बोलताना सांगितले की या संस्थेच्या माध्यमातून प्रथम सभासदांचे हित जोपासले जाते.आणि शिक्षकी पेशा सारखा पवित्र व्यवसाय दुसरा कोणताही नाही. शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे. शिक्षकच या संस्थेचे पदाधिकारी असलेमुळे तेवढ्याच आत्मियतेने या संस्थेचा कारभार करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. नंदकुमार सागर यांनी सांगितले की ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होतो ते राष्ट्र विकासात ,ज्ञानात अग्रेसर असते.कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी आरोग्य विभागापेक्षाही चांगले काम केले आहे.प्रसंगी शाळेत अध्यापन करीत असताना शिक्षकांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होते परंतु सेकंडरी पतसंस्थेच्या माध्यमातून या पाल्यांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या नवीन संकल्पना सांगितल्या संस्थेचे मोबाईल ऍप आणणार आहोत त्यायोगे सभासदांना घरबसल्या आपल्या खात्याची माहिती मिळेल.संस्थेच्या माध्यमातून पर्यटन उपक्रम राबवून सभासदांना व त्यांच्या कुटुंबीयांना माफक दरात परदेशी वारीसाठी सहाय करणार.तसेच सभासदांना मेडिक्लेम पाॅलिसीच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, शेवटी आपण सर्व तेहतीस हजार सभासद या संस्थेचे मालक आहात आणि म्हणून संस्थेच्या माध्यमातून जेवढे म्हणून करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील.महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यात भविष्यात शाखा सुरू करुन संपूर्ण शिक्षक बांधव एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. संस्थेचा सध्याचा व्यवसाय सतराशे कोटी आहे तो येत्या पाच वर्षांत तीन हजार कोटींवर घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला.या कार्यक्रमाला सेकंडरी पतसंस्थेचे सहसचिव सतिश माने, खजिनदार सतेज शिंदे संचालक गुलाबराव गवळे, तुकाराम बेणके, सचिन नलावडे, प्रमोद देशमुख, जगन्नाथ जाधव, गोविंद सुळ व सेकंडरी पतसंस्थेचे सासवड शाखेचे व्यवस्थापक, कर्मचारी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश कांचन, विजय चिकने,आदिनाथ थोरात मोहन ताकवले हवेली तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव हनुमंत पवार दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनायक सुंभे सचिव रामचंद्र नातू, भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील गायकवाड, ,कला संघटनेचे नेते आंबा सायकर श्री जाधव बारामती मुख्याध्यापक संघाचे सचिव संदीप जगताप, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, आत्माराम शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, रामदास शिंदे, बिभीषण जाधव, उत्तम निगडे, पांडुरंग पाटील, दिलीप नेवसे पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर, प्रल्हाद गिरमे शिक्षक लोकशाही आघाडी चे कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे, दिलीप पापळ प्रल्हाद कारकर, बाबुराव गायकवाड,संजय भिंताडे दत्तात्रय रोकडे,प्रशांत बेंगळे ,संजय धुमाळ, पांडुरंग जाधव,सिदाम कांबळे, महिला संघांच्या मोहिनी लोणकर,सौ कावेरी भोसले, निर्मला निगडे, अबोली भोंगळे,मिलन जाधव, संगिता रिकामे,सौ.वाघमारे,सौ.जाधव पुरंदर,भोर,वेल्हे बारामती या तालुक्यातील शिक्षक सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेकंडरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी केले, सुत्रसंचलन पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांनी केले, बक्षीस वितरण रमेश बोरावके, आभार तुकाराम बेणके यांनी मानले.
चौकट:-आमच्या पुरंदरमधील सुधाकर जगदाळे यांना १८००कोटी रु संयुक्त व्यवसाय असलेल्या पतसंस्थेचे उपाध्यक्ष केल्याबद्दल शामकांत भिंताडे, दिगंबर दुर्गाडे व आमदार संजय जगताप यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.