बँक ऑफ इंडियाचे वतीने महिला बचत गट मेळावा संपन्न …

सासवड शाखेने केले दीडशेहून अधिक महिला बचत गटांना सुमारे १५कोटींचे कर्ज वितरण ..

सासवड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ इंडिया सासवड आणि बचत गटांचे काम पाहणाऱ्या हेल्पो संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड येथील कुंजीर वाड्यात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सासवड सह गराडे, पिसर्वे, आंबळे, भोसलेवाडी, मावडी सुपे इत्यादी ठिकाणच्या सुमारे तीनशेहून अधिक महिलांनी यावेळी सहभाग नोंदवला. बँकेच्या कार्यकारी संचालक मोनिका कालिया यांनी व्हिडिओ कॉनफरसिंगद्वारे साधलेला संवाद, झोनल मॅनेजर एसपी बीसवाल यांनी वीसी मार्फत दिलेल्या शुभे्छा व सासवड पालिकेचे मुख्याधिकारी निलेश मोरे यांची सन्माननीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सासवड शाखाधिकारी रवि गुदमलयांनी उपस्थितांचे स्वागत केले. शकुंतला भोसले, विद्या जगदाळे, प्रतिभा चव्हाण, सुवर्णा कोलते, रिया मोहिते, आश्र्विनी सोनवणे या महिलांनी मनोगते व्यक्त केली.
रोखपाल प्रदिप केशवराव जगताप व विकास विजय जगताप यांना नगरपालिकेच्या वतीने याच कार्यक्रमात “कोविड योद्धा” म्हणून गौरवण्यात आले. गुरुराज गडदरे यांनी महिलांना सोने तारण कर्ज, विमा योजना इत्यादी विषयी माहिती दिली. हेल्पो संस्थेच्या शमीम शेख यांनी महिलांना उत्तम मार्गदर्शन करत बँक ऑफ इंडिया कर्जाबाबत करत असलेल्या कामगिरीचे कौतुक केले. वर्षभरात सासवड शाखेने दीडशेहून अधिक गटांना सुमारे १५कोटींचे कर्ज वितरण केल्याचे शेख यांनी सांगितले.
नेहा पुंडेकर ,सुवर्णा कामथे, सुहाना शेख, निलेश भापकर, उज्वला वाबळे, चित्रा उल्लाळकर, पूजा झेंडे यांसह अनेक मान्यवर यावेळी ऊपस्थित होते . पिसर्वे शाखेचे हेमंत ताकवले यांनी सूत्रसंचलन केले. गराडे शाखा अधिकारी प्रवीण लंके, पिसर्वे शाखा अधिकारी लिंबाजी लाखे, विकास जगताप यांसह अनेकांनी उत्तम संयोजन केले. संतोष कामथे यांनी आभार मानले.

सासवड येथे संपन्न झालेल्या महिला मेळाव्यात बचत गटाला कर्ज वितरित करतांना सासवड नगरपालिका मुख्याधिकारी निलेश मोरे

Leave a Reply

Your email address will not be published.