सासवड::वाघीरे महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांना पीएच.डी.पदवी जाहीर सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांना राजस्थान येथील श्री जगदीशप्रसाद झाबरमल तीब्रेवाला विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्र विषयाची पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी “विकीमिडीया फाऊंडेशन संचलित आशय प्रकल्पांचे संदर्भ स्त्रोतांचा संच म्हणून मूल्यमापन” या विषयावर विद्यापीठास संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यांना यशस्वी मौखिकीनंतर पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा भोसले, उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, डॉ. संजय झगडे, डॉ. नाना झगडे डॉ. नाना झगडे, प्रा. संतोष मोकाशी तसेच शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांनी डॉ. संकपाळ यांचे अभिनंदन केले.