संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते व सचिव शिवाजी घोगरे शुभेच्छा देताना.
 महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्त पदी नुकतीच सुरज मांढरे यांची नियुक्ती ..

 सासवड ::महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी नुकतीच सूरज मांढरेेे यांचीनुकतीच नियुक्ती करण्याात आली .त्यानंतर आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडून नुकताच त्यांनी कार्यभार स्वीकारला.संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण या संस्थेच्या वतीने  संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते व सचिव शिवाजी घोगरे यांनी त्यांना शुभेच्या दिल्या. 
सुरज मांढरे हे पुणे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही प्रभावी कार्य केले आहे. 
       शिक्षण संस्था चालवीत असताना येणाऱ्या अनेक अडचणी आज भेडसावत आहेत. पवित्र पोर्टल च्या माध्यमातून सुरु असलेले शिक्षक भरती मंद गतीने चालू आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ईसीबीसी आरक्षणातील जागा इडब्लूएस संवर्गात रूपांतरित करून भरती प्रक्रियेला वेग देणे. २०१७ नंतर रिक्त असलेल्या शिक्षक पदांची प्रलंबित भरती सुरु करणे. वेतनेतर अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे. अशा सर्वच विषयांवर संस्थाचालकांची चर्चा करून मार्ग काढण्याचे त्यांनी मान्य केले. लवकरच संस्थाचालकांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावून या प्रश्नावर उपाय योजना केली जाईल असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते व सचिव शिवाजी घोगरे शुभेच्छा देताना.

Leave a Reply

Your email address will not be published.