युनिटी” रुग्णालयाला सासवड पालिकेचा पुरस्कार.
सासवड (प्रतिनिधी) सासवड नगरपालिकेकडून सासवड येथील युनिटी हॉस्पिटलला स्वच्छ सर्वेक्षण२०२२ तसेच माझी वसुंधरा २.०अभियानाअंतर्गत स्वच्छ हॉस्पिटल म्हणून नुकतेच गौरवण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी मोरे यांनी सन्मानपत्र देऊन हा पुरस्कार रुग्णालयाला दिला आहे. आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व सामान्यांना वाजवी दरात अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य विषयक उपचार उपलब्ध करण्याच्या उद्देशानेव समाजाप्रती उत्तरदायित्व पार पाडण्याच्या हेतूने केवळ दहा महिन्यांपूर्वी शहरातील काही नामांकित डॉक्टर मंडळीनी एकत्र येऊन उभारलेल्या या हॉस्पिटलच्या या सन्मानाने सर्वत्र कौतुक होत आहे.
युनिटी रुग्णालयाचे संचालक मंडळ डॉ सुहास होळकर, डॉ स्वप्नील महाजन, डॉ राकेश अत्राम, डॉ देविदास नवले, डॉ विलास सुर्यवंशी व डॉ तुषार काटे
यांनी नगरपालिकेच्या या गौरवाबद्दल आभार मानत भविष्यात हे हॉस्पिटल पालिकेच्या सर्व सामजिक उपक्रमात सहभाग नोंदवेल असा आशावाद व्यक्त केला.
डॉ होळकर यांनी या निमित्ताने रुग्णालयातील विविध आधुनिक सुविधांची माहिती दिली. व्हेंटिलेटर, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सी आर्म मशीन, कॅट्री मशीन, डीफीब्रीलेटर मॉनिटर, विविध विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा,पुण्यातील प्रथितयश हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांचे पैनेल, सेंट्रलाईझड ओ 2आदी
विविध सुविधांसह प्रशिक्षित परिचारिका आणि आम्ही सर्व संचालक मंडळी परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी कटिबध्द आहे असे डॉ महाजन यांनी सांगितले.
फोटो.. सासवड नगर पालिकेच्या वतीने सासवडच्या युनीटी रुग्णालयास स्वच्छ रुग्णालय म्हणूनगौरवण्यात आले