अखिल भारतीय मराठा महासंघ पुरंदर च्या वतीने जिजाऊ जयंती संपन्न

अखिल भारतीय मराठा महासंघ पुरंदर च्या वतीने जिजाऊ जयंती संपन्न..

विविध क्षेत्रात काम करणा-या कतृत्ववान महिलांचा सन्मान ..

सासवड: सासवड येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने राजमाता जिजाऊ यांचे जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा पुरंदर मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षा डाॅ.वृषाली जगताप यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.याप्रसंगी पुरंदर तालुका मराठा महासंघाचे पदाधिकारी ऊपस्थीत होते.
डॉ. वृषाली जगताप यांच्या हस्ते जेजुरी च्या मुख्याधिकारी पूनम शिंदे,तायक्वोंदो या खेळात प्रविण्य मिळविलेल्या सायली जगताप, पुरंदर शिक्षक पतसंस्थेच्या सभापती वैजंता कुंजीर, आदर्श शिक्षिका योगिनी फडतरे, यांना राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा व पुढचे पाऊल हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले .
या प्रसंगी तालुका अध्यक्ष गणेश मुळीक,उपाध्यक्ष रामभाऊ बोरकर, सचिव संजय पापळ, युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, उपाध्यक्ष विवेक तळेकर, सासवड शहर अध्यक्ष संदीप जगताप, उपाध्यक्ष चिन्मय कुंजीर,कार्याध्यक्ष दिपक अप्पा जगताप,संघटक नंदू बापू जगताप, संघटक शलील महाराज,सागर जगताप ,संतोष जगताप, शिक्षक संघटनचे राजेंद्र जगताप, संचालक राजेंद्र कुंजीर, तानाजी फडतरे, अॅड.विशाल शिंदे, अनिल कुंजीर, सर्व मराठा महासंघा चे व शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.