सामाजिक भावनेतून लावले अनाथ मुलीचे लग्न..
स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम!!
सासवड (प्रतिनिधी) गराडे परिसरातील “साई चिलड्रन्स होम”या अनाथ आश्रमातील कु चैत्राली या निराधार मुलीचे लग्न करुन सासवडच्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे एक वेगळी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. कोडीत गावच्या कैलास तुकाराम जरांडे यांचे चिरंजीव चि महेश आणि आश्रमातील चैत्राली यांचा शुभविवाह येथील जयदीप मंगल कार्यालयात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आश्रमाच्या माई पंडित यांनी मुलीची साडीचोळी व सोन्याचा दागिना घेतला. मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब भिंताडे यांनी लग्नाचा हॉल उपलब्ध करून दिला, विद्यमान नगरसेवक संतोष खोपडे व त्यांच्या मित्र परिवाराने सुग्रास भोजन व बँड व्यवस्था पाहिली तर या सर्व बाबींची जुळवाजुळव करून एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानने हे सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडले. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, भानुकाका जगताप, सचिन पठारे यांसह मुलाकडील कोडित गावच्या वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सुदंर सोहळा पार पडला. गेली दोन वर्षांपासून प्रतिष्ठान आश्रमातील एका मुलीचे लग्न अन्य सहकाऱ्यांचे मदतीने करून देत असल्याची माहिती अध्यक्ष संतोष जगताप यांनी दिली
फोटो.. चैत्राली व महेश यांच्या विवाह प्रसंगी उपस्थित मान्यवर
Read more